World Wetland Day
World Wetland Day

हे पृष्ठ 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 2 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • World Wetland Day

महत्त्वाच्या घटना:

इदी अमीन

१९७१ : इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

१९७१ : इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

१९६२ : ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति

१९५७ : गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९४३ : दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात

१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१८४८ : कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

शमिता शेट्टी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७९ : शमिता शेट्टी – अभिनेत्री

१९२३ : ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)

१९०५ : अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू: ६ मार्च १९८२)

ललित नारायण मिश्रा

१८८४ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)

१८५६ : स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

विजय अरोरा

२००७ : विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

१९८७ : अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)

१९७० : बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (१८ मे १८७२)

१९३० : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व शकार. त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते. (जन्म: १२ एप्रिल १८७१)

१९१७ : महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)

१९०७ : दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *