१८ मे दिनविशेष - 18 May in History
१८ मे दिनविशेष - 18 May in History

हे पृष्ठ 18 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 18th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक संग्रहालय दिन
जागतिक संग्रहालय दिन

जागतिक संग्रहालय दिन

18 May: International Museum Day

जागतिक एड्स लसीकरण दिवस / एचआयव्ही लसीकरण जागरुकता दिवस

World AIDS Vaccine Day / HIV Vaccine Awareness Day

महत्त्वाच्या घटना:

वास्को-द-गामा
वास्को-द-गामा

१४९८: वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला.

१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.

१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला मूकपट ’पुंडलिक’ प्रदर्शित झाला.

१९३८: ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४०: ’प्रभात’चा ’संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

१९७२: कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.

नेपोलिअन बोनापार्ट
नेपोलिअन बोनापार्ट

१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने दिला.

१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

२००८: भारतीय पार्श्वगायक नितीन मुकेश यांना मध्यप्रदेश सरकारने भारतीय राष्ट्रीय पुरस्कार लता मंगेशकर देऊन त्यांचा सन्मान केला.

२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१०४८: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)

एच. डी. देवेगौडा
एच. डी. देवेगौडा

१६८२: छत्रपती शाहूराजे भोसले, संभाजीराजे व माहाराणी येसुबाई यांचे पुत्र.

१८५३: ब्रिटीश कालीन भारतातील भारतीय कवी, साहित्यकार, लेखक आणि समाजसुधारक तसचं, महिलांच्या हक्काचे रक्षणकर्ते व बालविवाहविरोधक उत्कृष वकील बहरामजी मेरवानजी मलबारी यांचा जन्मदिन.

१८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)

१९१३: पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य (मृत्यू: २ मे १९९८)

१९१४: भारतीय रिजर्व बँकेच्या दहाव्या गव्हर्नर एस. जगन्नाथ यांचा जन्मदिन.

१९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) (मृत्यू: २ एप्रिल २००५)

१९२२: नार्वे देशातील मानसोपचारतज्ञ जर्डा बोयेसन यांचा जन्मदिन.

१९३३: एच. डी. देवेगौडा, भारताचे अकरावे पंतप्रधान.

१९७७: भारतीय इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व भारतीय उद्योग व्यवस्थापक अनंत बजाज यांचा जन्मदिन.

१९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.

बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत
बाळशास्त्री जांभेकर, आद्य मराठी पत्रकार व विद्वान पंडीत

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.

१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)

१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)

१९८६: कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.

१९९७: कमलाबाई रघुनाथराव गोखले, पहिल्या स्त्री चित्रपट कलाकार.

१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.

२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)

२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.

२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *