२ अप्रैल दिनविशेष - 2 April in History
२ अप्रैल दिनविशेष - 2 April in History

हे पृष्ठ 02 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 2nd April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६७९: औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.

१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

१८८५: मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ ’पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बाँम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते.

१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

१९७५: कॅनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ टॉवर बांधून पुर्ण झाला.

१९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली. 

१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.

१९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन

१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना

१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.

२०११: अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.

२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६१८: फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ डिसेंबर १६६३)

१७८१: स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.

१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५)

१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)

१८८२: प्रसिध्द कादंबरीकार नाथमाधव.

१८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)

१९०२: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमर्‍या लोकप्रिय आहेत. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण)

१९१४: भारताचे पहिले फील्डमार्शल जनरल माणकेशा.

१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९)

१९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.

१९४४: अजय देवगण – अभिनेता

१९६२: जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.

१९६५: नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.

१९६९: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.

१९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.

१९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७२०: पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ.

१८७२: सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१)

१९९२: आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते (जन्म: ? ? ????)

१९३३: ज्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक स्पर्धा घेतल्या जातात, असे प्रसिध्द क्रिकेटपटू रणजितसिंहजी विभाजी जाडेजा.

१९३३: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात. (जन्म: १० सप्टेंबर १८७२)

२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२०)

२००९: गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *