हे पृष्ठ 27 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २७ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 27 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१८६१: पहिल्यांदा कोलकत्ता येथे चहा ची सार्वजनिक बोली पार पडली.
१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
१९३४: पर्शिया च्या शाह ने पर्शिया चे नाव बदलवून इरान ठेवण्याची घोषणा केली.
१९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
१९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९६६: जगातील सर्वात लांब गुफा “Cave of Swallows” चा शोध लागला.
१९६८: चंद्राची परिक्रमा करणारे अपोलो-8 स्पेस एअर क्राफ्ट समुद्रात उतरविले.
१९७२: उत्तर कोरिया मध्ये नवीन संविधान मंजूर झाले.
१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
२००८: व्ही शांताराम पुरस्कार समारोहा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तारे ज़मीं पर ला पुरस्कार मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
१६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
१७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
१७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
१८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
१८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१९३७: लोकसभेचे माजी सदस्य शंकर दयाल सिंह यांचा जन्म.
१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
१९४२: परमवीर चक्र विजेता आणि देशाचे सैनिक अल्बर्ट एक्का यांचा जन्म.
१९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
१९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
१९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
१९७२: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २३ एप्रिल १८९७)
१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
२००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
२००३: ला भारतीय कवी के एस एस नरसिंहस्वामी यांचे निधन.
२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३)
२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.