२३ जानेवारी दिनविशेष - 23 January in History
२३ जानेवारी दिनविशेष - 23 January in History

हे पृष्ठ 23 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 23 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.

महत्त्वाच्या घटना:

डॅनिअल पर्ल
डॅनिअल पर्ल

१५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर

१७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

१७९३: आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.

१८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.

१९२७: मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.

१९३२: ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.

१९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

१९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.

१९७७: जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.

१९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

२००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण

२००२: ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.

२००९: ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

मेगावती सुकार्नोपुत्री
मेगावती सुकार्नोपुत्री

१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)

१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)

१८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)

१९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२)

१९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक (मृत्यू: ? ? २००२)

बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे

१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)

१९३०: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.

१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)

१९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

१९८७: भारतीय चित्रपट कलाकार दुष्यंत वाघ चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

पं. दिनकर कैकिणी
पं. दिनकर कैकिणी

१६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)

१९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)

१९३१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)

१९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित (जन्म: ? ? ????)

१९६३: ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक नरेंद्र मोहन सेन यांचे निधन.

१९६४: छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे निधन.

१९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. (जन्म: ११ मे १९०४)

१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????)

२०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ आक्टोबर १९२७)

२०१५: ला सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *