४ जून दिनविशेष - 4 June in History
४ जून दिनविशेष - 4 June in History

हे पृष्ठ 4 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 4th June. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन

जागतिक दिवस:

  • राष्ट्र सेवादल दिवस,
  • हुतात्मा दिन,
  • विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
  • सेना दिन: फिनलंड.
  • स्वातंत्र्य दिन: टोंगा.

महत्त्वाच्या घटना:

१०३९: हेन्री तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.

१६७४: मराठा साम्राज्य – राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

१७९२: कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.

१७९४: ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस जिंकली.

१८०४: आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.

१८६२: अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.

१८७६: न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

१९१२: मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.

१९२०: ट्रायानॉनचा तह.

१९२८: तैवानच्या राष्ट्राध्यक्ष झ्हाँग झुओलिनची हत्या.

१९२९: अमेरिकन उद्योगपती व ईस्टमेन कोडक कंपनीची संस्थापक जॉर्ज ईस्टमैन यांनी पहिल्या रंगीत चित्रपटाचा नमुना सादर केला.

१९३९: ज्यूंचे शिरकाण – युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.

१९४२: दुसरे महायुद्ध-मिडवेची लढाई सुरू.

१९४३: आर्जेन्टिनामध्ये लश्करी उठाव, रमोन कॅस्टियोची हकालपट्टी.

१९४४: अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-५०५ ही पाणबुडी पकडली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

१९५९: भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक सी राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

१९६७: ब्रिटिश मिडलँड विमान कंपनीचे विमान कोसळले. ७२ ठार.

१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९७९: घानामध्ये लश्करी उठाव.

१९८९: आयातोल्ला रुहोल्लाह खोमेनीच्या मृत्यूनंतर आयातोल्ला अली खामेनेई इराणच्या नेतेपदी.

१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

१९९४: मजरुह सुलतानपुरी – यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९४: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९७: इन्सॅट-२डी – या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९९७: नासाचे मार्स पाथफाइंडर प्रोब मंगळावर उतरले.

२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

२००८: हरियाणा राज्य सरकारकडून २५ वर्षांखालील मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ जाहीर करण्यात आला.

२०१०: स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेट – पहिले उड्डाण.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७३८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

अशोक सराफ, लोकप्रिय मराठी अभिनेते.
अशोक सराफ, लोकप्रिय मराठी अभिनेते.

१९०४: भगत पूरण सिंग – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी – पद्मश्री (निधन: ५ ऑगस्ट १९९२)

१९१०: होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

१९१५: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

१९१६: रॉबर्ट एफ. फर्चगॉट – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ मे २००९)

१९३१: साली भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्या बिना राय यांचा जन्मदिन.

१९३६: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१९४६: एस. पी. बालसुब्रह्मण्यम – चित्रपट पार्श्वगायक – पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २५ सप्टेंबर २०२०)

१९४७: अशोक सराफ, लोकप्रिय मराठी अभिनेते.

१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

१९७५: अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.

गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.
गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.

१९९०: जेत्सुन पेमा वांग्चुक, भूतानाची राणी.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१८: प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी व भाषांतरकार रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन.

१९४७: धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

१९६२: चार्ल्स विल्यम बीब (चित्रित), अमेरिकन निसर्गतज्‍ज्ञ.

धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
धर्मानंद दामोदर कोसंबी, बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.

१९९८: डॉ. अश्विन दासगुप्ता, इतिहासतज्‍ज्ञ, शिक्षणतज्‍ज्ञ.

१९९८: गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक.

२०१४: अमेरिकन बेसबॉल खेळाडू, व्यवस्थापक आणि मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) चे प्रशिक्षक डॉन झिम्मर यांचे निधन.

२०१५: सकू सुप्रसिद्ध अमेरिकन विन्स्टन चषक मालिका कार रेस ड्रायव्हर जबे थॉमस यांचे निधन.

२०२०: बासु चटर्जी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, जन्म: १० जानेवारी १९३०).

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *