५ जून दिनविशेष - 5 June in History
५ जून दिनविशेष - 5 June in History

हे पृष्ठ 5 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 5th June. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिन

जागतिक दिवस:

  • जागतिक पर्यावरण दिन
  • संविधान दिन : डेन्मार्क.
  • मुक्ती दिन : सेशेल्स.

महत्त्वाच्या घटना:

१५०७: इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी व्यापार करारावर आपली सहमती दर्शविली.

१६५९: मुघल बादशाहा औरंगजेब यांनी दिल्ली येथे राज्याभिषेक केला.

१८४९: डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.

१८६४: अमेरिकन यादवी युद्ध-पीडमॉंटची लढाई – दक्षिणेचा पराभव.

१९०७: स्वामीनारायण पंथाची स्थापना.

१९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

१९२४: अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.

१९५२: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.

१९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.

१९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.

१९७५: १९६७ पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

१९७४: जागतिक पर्यावरण दिन

१९७७: सेशेल्समधे उठाव झाला.

१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

१९८४: अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.

१९८९: चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.

१९९४: ब्रायन लारा – यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

नारायण मल्हार जोशी
नारायण मल्हार जोशी

१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडॅम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

१८७९: नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.

१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)

डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१८८३: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)

१९००: डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)

१९४५: अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.

१९५०: हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

१९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म.

१९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१०: अमेरिकन लघुकथा लेखक ओ. हेनरी यांचे निधन.

१९१६: लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.

१९४२: स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रतिभाशाली गझल आणि गीत गायक मास्टर मदन यांचे निधन.

१९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर २०११)

१९७३: मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.

१९८७: ग. ह. खरे, इतिहासतज्‍ज्ञ.

१९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३)

१९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.

२००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)

२०१६: एलिनॉर झेलियट (अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार, जन्म: ८ ऑक्टोबर १९२६).

२०१७: भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून सर्वात जास्त जड वजनी “जीएसएलव्ही मार्क -3 डी -1” रॉकेट् चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *