२६ मार्च दिनविशेष - 26 March in History
२६ मार्च दिनविशेष - 26 March in History

हे पृष्ठ 26 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 26th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • स्वातंत्र्य दिन: बांगलादेश.

महत्त्वाच्या घटना:

१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

१६६८: इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या मध्यमातून मुंबई प्रांतावर आपले अधिकार प्राप्त केले होते.

१७८०: ब्रिटीश वर्तमानपत्र ब्रीट गैजेट आणि संडे मॉनीटर यांचे प्रकाशण सर्वप्रथम रविवारच्या दिवशी करण्यात आले.

१९०२: नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय कायदेमंडळात अर्थसंकल्पावर इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर असे पहिले भाषण झाले.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.

१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

१९७२: पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

२०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९७१: बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)

१८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

१८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

१८७९: स्विस-अमेरिकन सिव्हिल इंजिनियर ओथमार हमेन अम्मान यांचा जन्मदिन. त्यांनी डिझाईन केलेल्या ब्रिज डिझाईन्समध्ये जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज, वेर्राझानो-नारोज ब्रिज आणि बायोन ब्रिज यांचा समावेश आहे.

१८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

१८९८: जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी पुमा व अ‍ॅडिडासचे संस्थापक रुडॉल्फ “रुडी” डसलर यांचा जन्मदिन.

१९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

१९१९: भारतीय राजकारणी, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि दिग्गज कॉंग्रेसचे नेते तासेच विधानसभेचे माजी सभासद व माजी कॅबिनेट मंत्री भिकाजीराव जिजाबा खताल- पाटील यांचा जन्मदिन.

१९२९: शीख धार्मिक नेत्यांच्या संत मतवादी वंशाचे आध्यात्मिक शिक्षक ठाकर सिंह यांचा जन्मदिन.

१९३३: हिंदी साहित्य व संस्कृतीचे लेखक आणि अभ्यासक कुबेर नाथ रे यांचा जन्मदिन.

१९६९: विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

१९७३: लंडन स्टॉक एक्सचेंज ने २०० वर्ष जुने ऐतिहासिक नियम मोडीत काढत महिलांना पहिल्यांदाच नोकरीवर रुजू करून घेतले.

१९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

१९८७: भारतीय फुटबॉल खेळाडू रॉविल्सन रॉड्रिग्ज यांचा जन्मदिन.

१९९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

१८२५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)

१९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)

१९३८: लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ज्येष्ठ असमिया साहित्यिक.

१९९६: के. के. हेब्बर, भारतीय चित्रकार.

१९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)

१९९७: नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती.

१९९८: डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक.

१९९९: आनंद शंकर, संगीतकार.

२००१: जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी.

२००३: डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.

२००३: हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या).

२००३: देविदास सडेकर, मराठी पत्रकार.

२००६: भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगाल राज्य  समितीचे सचिव अनिल विश्वास यांचे निधन.

२००८: महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन.

२०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *