२७ मार्च दिनविशेष - 27 March in History
२७ मार्च दिनविशेष - 27 March in History

हे पृष्ठ 27 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 27th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक रंगभूमी दिवस
जागतिक रंगभूमी दिवस

जागतिक दिवस:

  • जागतिक रंगभूमी दिवस

महत्त्वाच्या घटना:

१६६७: शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले.

१६६८: इंग्लंड देशाचे शासक चार्ल्स द्वितीय यांनी मुंबई प्रांताला ब्रिटीश शासकांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केलं

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१८४१: वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी सर्वप्रथम न्यूयार्क देशांत घेण्यात आली.

१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१८५५: कॅनेडियन फिजिशियन(वैद्य) अब्राहम गेस्नर यांनी केरोसीन (रॉकेल) चे नमुने शोधले.

१८७१: पहिला आंतरराष्ट्रीय रग्बी सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या संघादरम्यान खेळण्यात आला.

१८९३: केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९६१: साली पहिला जागतिक रंगमंच दिन साजरा करण्यात आला.

१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

१९९२: ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

२००१: लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.

२००४: नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७८५: लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ८ जून १७९५)

१८४५: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)

१९०१: कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

१९१५: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी आणि उत्तर-पूर्व भारतीय आसाम राज्याच्या आमदार पुष्पलता दास यांचा जन्मदिन.

१९१७: भारतीय कवी कामाखी प्रसाद चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन.

१९२३: प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी विद्वान लीला दुबे यांचा जन्मदिन.

१९३९: भारतीय राजनेता बनवारी लाल जोशी यांचा जन्मदिन.

१९५४: मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचे प्रोफेसर हेमंत जोशी यांचा जन्मदिन.

१९९०: भारतीय फिल्ड हॉकी खेळाडू हरबीरसिंग संधू यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

युरी गागारीन
युरी गागारीन

१८९८: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.

१९१५: महान भारतीय क्रांतिकारक पंडित कांशीराम यांचे निधन.

१९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)

१९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९६८: युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.

१९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.

१९९७: भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.

२०००: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *