या पृष्ठावर, आम्ही  11 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 11th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

महत्त्वाच्या घटना:

१६६५: शिवाजीमहाराजांनी राजा जयसिंगची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सलोख्याची बोलणी करण्यासाठी त्याच्या शिबिरामध्ये प्रवेश केला.

१७७६: इ.स. १७७६ साली अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.

१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

१९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.

लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

१९२१: सन १९२१ साली ब्राझील देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

१९३५: एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

१९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.

१९५५: सन १९५५ साली जगातील पहिल्या मैग्नेशियम जेट विमानाने भरारी घेतली.

१९६४: सन १९६४ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थ्या संपूर्ण देशभर विसर्जित करण्यात आल्या.

१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

१९८७: सन १९८७ साली १६० वर्षाच्या कालखंडात ब्रिटीश देशाच्या पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर(Margaret Thatcher) या पहिल्या ब्रिटीश नागरिक ठरल्या.

२००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)

क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल
क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल

१८८०: अमेरिकेचे पहिले संसद सदस्य रैफिन यांचा जन्मदिन.

१८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

१९०९: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसचं, निट्टे एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक के.एस. हेगडे यांचा जन्मदिन.

१९२४: साली भारतीय व्यंगचित्रकार, पत्रकार आणि लेखक अत्तूपुरथू मॅथ्यू अब्राहम उर्फ अबू अब्राहम यांचा जन्मदिन.

कनक रेले
कनक रेले

१९३७: साली पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक आणि शैक्षणिक तसचं, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापक-दिग्दर्शिका आणि मुंबईतील नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या संस्थापक-प्राचार्या कनक रेले यांचा जन्मदिन.

१९४२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय उत्प्रेरक वैज्ञानिक, आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक पॉल रत्नसामी (Paul Ratnasamy) यांचा जन्मदिन.

१९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.

१९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

१९८९: भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी गिरीशचंद्र जोशी यांचा जन्मदिन.

१९९०: साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकी पटू सविता पुनिया यांचा जन्मदिन.

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

३२३: ३२३ई.पुर्व : मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

१७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)

घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती.
घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती.

१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)

१९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)

राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.
राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.

१९५०: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी तसचं, भारतीय राष्ट्रीय शिक्षक म्हणून ओळखले लोकप्रिय असणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे निधन.

१९८३: घन:श्याम बिर्ला, भारतीय उद्योगपती. (जन्म: १० एप्रिल १८९४)

१९९७: भारतीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय दूर अंतरीय जलतरणपटू आणि व्यावसायिक तसचं, इग्लिश खाडी पार करणारे पहिले भारतीय नागरिक मिहीर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)

२०००: राजेश पायलट, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *