२२ सप्टेंबर दिनविशेष - 22 September in History
२२ सप्टेंबर दिनविशेष - 22 September in History

हे पृष्ठ 22 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २२ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 22 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

१. International Day Of Radiant Peace
२. World Rhino Day
३. World Car Free Day

महत्त्वाच्या घटना:

सुनील गावसकर
सुनील गावसकर

१४९९: बेसलचा तह – स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१८८८: ’द नॅशनल जिऑग्रॉफिक’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९३१: नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.

१९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.

१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले. यातील बहुसंख्य तामिळ विद्यार्थी होते.

१९९५: घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकास असल्याचा दिल्ली उच्‍च न्यायालयाचा निर्णय

१९९८: क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ’महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च सन्मान जाहीर

२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

अनंत माने
अनंत माने

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९१: मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

१८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.

१८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.

व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री
व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री

१८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.

१८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.

१८८७: कर्मवीर भाऊराव पाटील – शिक्षणतज्ञ, बहुजनसमाजातील तळमळीचे कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण (मृत्यू: ९ मे १९५९)

१९०९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक (मृत्यू: ३ आक्टोबर १९५९)

१९१५: अनंत माने – पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ९ मे १९९५)

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

१९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

१५३९: गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)

१८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.

१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

१९५६: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

१९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

१९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.

१९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म: ३० मार्च १८९९)

१९९१: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (जन्म: १४ जानेवारी १९०५)

मन्सूर अली खान पतौडी
मन्सूर अली खान पतौडी

१९९४: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

२००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

२०११: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (जन्म: ५ जानेवारी १९४१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

  1. hii ,
    If you have whatsapp group then please add me in that group …

    PRASHANTBANDGAR
    Whatsapp No- 9892319248

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *