हे पृष्ठ 6 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 6th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६५६: शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. [चैत्र व. ७]
१६५६: चंद्रराव मोरे याचा शिवाजी महाराजांनी पराभव करुन रायगड किल्ला सर केला व आपली राजधानी केली.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९१९: रौलेट अॅक्टविरुध्द हरताळ पाळण्यात आला.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला. या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८: पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
२०००: ’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७३: जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ जून १८३६)
१८६४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
१८८६: ब्रिटीश कालीन भारतातील सर्वात मोठी रियासत हैदराबाद येथील निजाम संस्थेचे शेवटचे शासक निजाम उस्मान अली खान यांचा जन्मदिन.
१८९०: अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)
१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९८१)
१९०९: जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. (मृत्यू: २२ सप्टॆंबर १९९४)
१९१७: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
१९१९: रघुनाथ विष्णू पंडित – कोंकणी कवी (मृत्यू: ? ? ????)
१९२७: विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (मृत्यू: २८ जून २०००)
१९२८: जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ
१९३१: रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)
१९५६: दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू व प्रबंधक
१९७१: प्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय सुरी यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
११९९: रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)
१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
१९७३: भारतीय केरळ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निबंध लेखक मल्याळम साहित्य समिक्षक कारिककट्ट मराठू कुट्टीकृष्ण मारार यांचे निधन.
१९८१: शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
१९८३: जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ – १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ – १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण (जन्म: १० जून १९०८)
१९८९: पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
१९९०: माकप नेते व राजकारणी तसचं कामगार संघटनेचे नेते भालचंद्र त्र्यंबक रणदिवे यांचे निधन.
१९९२: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)
२००१: भारताचे माजी ६ वे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे निधन.