आशा भोसले
आशा भोसले

हे पृष्ठ 8 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 8 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • पाकिस्तान – विजय दिवस

महत्त्वाच्या घटना:

मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी
मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी

२००१ : लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड

२००० : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.

१९९१ : मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

सुभाष गुप्ते
सुभाष गुप्ते

१९६६ : ’स्टार ट्रेक’ या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

१९६२ : नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९५४ : साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना

१८५७ : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

१८३१ : विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

भूपेन हजारिका
भूपेन हजारिका

१९३३ : आशा भोसले – गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्‍या प्रसिद्ध पार्श्वगायिका

१९२६ : भूपेन हजारिका – संगीतकार व गायक (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)

१९२५ : पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१८८७ : स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (मृत्यू: १४ जुलै १९६३)

१८४८ : व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)

११५७ : रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कमला सोहोनी
कमला सोहोनी

२०१० : मुरली – तामिळ अभिनेता (जन्म: १९ मे १९६४)

१९९७ : कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ (जन्म: १८ जून १९११)

१९९१ : वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. त्यांची ‘सखी शेजारिणी तू हसत रहा‘, ‘त्यातरुतळी विसरले गीत‘, ‘बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात‘, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे‘ इ. भावगीते लोकप्रिय आहेत.

१९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे ‘वेलांटी‘, ‘पहाटतारा‘, ‘शततारका‘, ‘रुद्रवीणा‘, ‘दोनुली‘, ‘मरणगंध’ इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ’मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले. (जन्म: ६ आक्टोबर १९१३)

१९८२ : शेख अब्दुल्ला – शेर – ए – कश्मीर (जन्म: ५ डिसेंबर १९०५)

१९८१ : निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (जन्म: १७ एप्रिल १८९७)

१९६० : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

७०१ : पोप सर्गिअस (पहिला) – (जन्म: १५ डिसेंबर ६८७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.