१४ जुलै दिनविशेष - 14 July in History
१४ जुलै दिनविशेष - 14 July in History

हे पृष्ठ 14 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on  14 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • Shark Awareness Day
  • Bastille Day

महत्त्वाच्या घटना:

आल्फ्रेड नोबेल
आल्फ्रेड नोबेल

१७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.

१८५३: न्युझीलंड मध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

१८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

१९०१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन.

१९०२: उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा जन्मदिन.

१९२०: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.

१९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.

१९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.

जेन गुडॉल
जेन गुडॉल

१९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.

१९७६: कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.

२००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

२०१३: डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.

रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन
रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५६: गोपाळ गणेश आगरकरलोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (मृत्यू: १७ जून १८९५)

१८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.

शंकरराव चव्हाण
शंकरराव चव्हाण

१८८४: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)

१८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)

१९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.

हशन तिलकरत्‍ने
हशन तिलकरत्‍ने

१९१७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)

१९२०: शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

१९४७: नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान

१९६७: हशन तिलकरत्‍ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी

१९७१: भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर फिल्ड हॉकी, सॉकर, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचे निधन.

लीला चिटणीस
लीला चिटणीस

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.

१९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)

१९६३: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या
प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या

१९७५: मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)

१९७९: अमेरिकेने अणुचाचणी केली.

१९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार (जन्म: ? ? ????)

१९९८: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)

यशवंत विष्णू चंद्रचूड
यशवंत विष्णू चंद्रचूड

२००३: लीला चिटणीस – हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)

२००३: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)

२००४: स्वामी कल्याणदेव, पद्म भूषण पुरस्कार विजेते धर्मगुरू, विचारवंत , समाजसुधारक

२००८: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *