१२ जुलै दिनविशेष - 12 July in History
१२ जुलै दिनविशेष - 12 July in History

हे पृष्ठ 12 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १२ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 12 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • World Paper Bag Day
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
डॉ. एम. एस. स्वामीनाथन

महत्त्वाच्या घटना:

१६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

१७९९: रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.

१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.

पी. एन. भगवती
पी. एन. भगवती

१९३५: [आषाढ शुद्ध एकादशी – आषाढी एकादशी] ’प्रभात’चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.

१९६०: राज्यातील भागलपूर आणि रांची विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

१९६१: मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.

१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.

अभिनेते दिलीपकुमार
अभिनेते दिलीपकुमार

१९७९: किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना

१९८५: पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर
सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर

१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.

१९९९: ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.

२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’टिळक पुरस्कार’ जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१००: १०० ई .पूर्व : रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.

यशवंत विष्णू चंद्रचूड
यशवंत विष्णू चंद्रचूड

१८१७: हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२)
ख्रिस्त पूर्व १०० : ज्यूलियस सीझर – रोमन सम्राट (मृत्यू: ? ? ख्रिस्त पूर्व ४२)

१८५२: अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.

१८५४: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२)

बिमल रॉय
बिमल रॉय

१८६३: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)

१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

१९०९: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)

१९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०१०)

संजय मांजरेकर
संजय मांजरेकर

१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८)

१९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.

१९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

१९६५: संजय मांजरेकर – भारतीय क्रिकेट भाष्यकार आणि माजी यष्टिरक्षक क्रिकेटपटू

१९८२: अर्जुन पुरस्कार विजेता महिला टेबल टेनिसपटू अचंत शरत कमल यांचा जन्मदिन.

१९९७: युवा नोबल पारितोषिक विजेता पाकिस्तानी स्त्रीवादी शैक्षणिक कार्यकर्त्या महिला मलाला यूसुफजई यांचा जन्मदिन.

दारा सिंग
दारा सिंग

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४८९: दिल्ली येथील लोदी वंशाचे संस्थापक व शासक बहलूल खान लोदी यांचे निधन.

१६६०: बाजी प्रभू देशपांडे (जन्म: ? ? १६१५)

१८९२: अलेक्झांडर कार्टराईट – बेसबॉलचे जनक (जन्म: १७ एप्रिल १८२०)

१९१०: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)

राजेंद्रकुमार
राजेंद्रकुमार

१९४९: आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.

१९९४: हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे वसंत साठे (आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली) (जन्म: ? ? ????)

१९९९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: २० जुलै १९२९)

प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण
प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण

२०००: मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.

२००१: देवांग मेहता – तंत्रज्ञान अग्रणी (जन्म: १० ऑगस्ट १९६०)

२०१२: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)

२०१३: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)

२०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *