हे पृष्ठ 14 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 14th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१९३१: ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९५५: राजकुमार महेन्द्र हे नेपाल देशाचे राजा बनले.
१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
१९७६: अमेरिकेने नेवादा या ठिकाणी परमाणु चाचणी केली.
१९८८: जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ
१९८८: गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
१९८८: प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.
२०००: कलकत्ता येथील ’टेक्निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२००१: चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.
२००७: कारगिल आणि स्कार्दू यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यात बस सेवा प्रारंभ करण्याबद्दल सहमती झाली.
२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुण्यात देण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८३३: पहिली महिला दंतचिकित्सक हॉब्स टेलर यांचा जन्मदिवस.
१८७४: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)
१८७९: अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल१९५५)
१८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)
१९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)
१९३१: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (मृत्यू: १३ जानेवारी २०११)
१९३३: मायकेल केन – ब्रिटिश अभिनेता
१९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.
१९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.
१९६५: भारतीय चित्रपट सुष्टीतील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचा जन्मदिन.
१९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.
१९७४: साधना घाणेकर ऊर्फ ’साधना सरगम’ – पार्श्वगायिका
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८३: कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक
१८८३: कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म: ५ मे १८१८)
१९३२: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ जुलै १८५४)
१९६३: भारताचे प्रमुख स्वतंत्रता सेनानी, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री आणि ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे प्रसिद्ध नेता जयनारायण व्यास यांचे निधन.
१९९८: दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)
२००३: कवी सुरेश भट (जन्म: १५ एप्रिल १९३२)
२०१०: गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.(जन्म: २३ ऑगस्ट १९१८)
२०१८: विश्व प्रसिद्ध इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ, लेखक तसेच, सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्ट स्टीफन्स हॉकिंग यांचे निधन.