१५ मार्च दिनविशेष - 15 March in History
१५ मार्च दिनविशेष - 15 March in History

हे पृष्ठ 15 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 15th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
  • नियोजन दिन
  • जागतिक अपंगत्व दिन

महत्त्वाच्या घटना:

१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.

१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह

१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

१८३१: मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.

१८६९: सिनसिनाटी रेड स्टॉकिंग्स प्रथम प्रो बेसबॉल संघ बनला.

१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.

१९०६: रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.

१९१९: हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन

१९३७: अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९४६: भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली.

१९५०: नियोजन आयोगाची स्थापना

१९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ’माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.

१९५९: मुंबईमध्ये लिज्जत पापड़ या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली

१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९८५: symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.

१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

२००३: हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी

२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७६७: अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जून १८४५)

१८६०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२६ आक्टोबर १९३०)

१८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)

१९०१: विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू: २४ मे १९९९)

१९२०: हॉकीपटू आर. फ्रान्सिस.

१९३४: बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिन.

१९४७: भारतीय पूर्व हॉकी खेळाडू अजित पाल सिंग यांचा जन्मदिन.

१९८५: भारतीय भारतीय रॅपर, संगीत निर्माता, गायक आणि चित्रपट अभिनेता हिरदेशसिंग तथा हनी सिंग यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

४४: ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.

१२३६: विश्व प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह यांचे निधन.

१९३७: व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.

१९८५: भारतीय इतिहासकार व लेखक राधा कृष्ण चौधरी यांचे निधन.

१९९२: डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर

२०००: लेडी राणू मुखर्जी – विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी

२००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.

२००३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.

२००९: प्रथम भारतीय विमान चालक महिला सरला ठकराल यांचे निधन.

२०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)

२०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *