१६ मार्च दिनविशेष - 16 March in History
१६ मार्च दिनविशेष - 16 March in History

हे पृष्ठ 16 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 16th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

१५२७: मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता.

१५२८: फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४]

१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१८४६: प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती.

१९११: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला.

१९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला.

१९४३: ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९५५: राष्ट्रीय लसीकरण दिवस

१९३६: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

१९९२: सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले.

२०००: हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर

२००१: नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान

२०१२: अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

राजपुतांच्या गृहिलोत वंशातील मेवाडचा राजा अमरसिंह.

१६९३: मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६)

१७५०: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)

१७५१: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६)

१७८९: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४)

१९०१: प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१)

१९०१: भारतीय क्रांतिकारक आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी पोट्टी श्रीरामुलु यांचा जन्मदिवस.

१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९५२)

१९२१: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९३६: भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९)

१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

१९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०)

१९४५: गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९)

१९४६: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५)

१९४७: हिदी साहित्य लेखक अयोध्या सिंह उपाध्याय ‘हरि औंध’ यांचे निधन.

१९९९: कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका (जन्म: ? ? ????)

१९९९: कुमुदिनी पेडणेकर – गायिका

२००७: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *