Contents
हे पृष्ठ 1 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 1 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- लोकमान्य टिळक पुण्यतिथी
- १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह
महत्त्वाच्या घटना:

२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
१९९६ : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
१९६० : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
१९४४ : पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८७६ : कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
१७७४ : जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५५ : अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक
१९५२ : यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
१९३२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२)
१९२४ : सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७)
१९२० : ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९)

१९१५ : श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष (मृत्यू: ? ? ????)
१९१३ : भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (मृत्यू: १ जुलै १९६२)
१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ – पुणे)
१७४४ : जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
ख्रिस्त पूर्व १० : क्लॉडियस – रोमन सम्राट (मृत्यू: ख्रिस्त पूर्व ५६)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६)
२००८ : अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६)
२००५ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)
१९९९ : निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्नागिरी)
११३७ : लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १ डिसेंबर १०८१)