dinvishesh-mpsc-13-march
dinvishesh-mpsc-13-march

हे पृष्ठ 13 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 13th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९६३ : अर्जुन पुरस्काराची सुरुवात

१९२८ : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला

१८५४ : नागपूर रियासतीची समाप्ती झाली.

१९९७ : कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.

२००७ : वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

१९९९ : जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्याकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन

१९९७ : मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.

१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

१९३० : क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.

१९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

१७८१ : विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२६ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक (मृत्यू: १७ आक्टोबर २००८)

१८९३ : डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: ३ एप्रिल१९८५)

१७३३ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)

१९९७ : शीला इराणी – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक (जन्म: ? ? ????)

१९९६ : शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म: २३ आक्टोबर १९४५)

१९९४ : श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व ‘सिटू’ या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते (जन्म: ? ? ????)

१९६७ : सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १ ऑगस्ट १९२४)

१९५५ : वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म: २३ जून १९०६)

१९०१ : बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १८३३)

१८९९ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (जन्म: २७ जून १८७५)

१८०० : बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे.  (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)

१९६९ : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.