१ जुलै दिनविशेष - 1 July in History
१ जुलै दिनविशेष - 1 July in History

हे पृष्ठ 1 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 1 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महाराष्ट्र कृषी दिन

महाराष्ट्र कृषी दिन

  • कॅनडा दिन: कॅनडा.
  • प्रजासत्ताक दिन: घाना.
  • केटी कोटी (मुक्ती दिन): सुरिनाम.
  • राष्ट्रीय डॉक्टर दिन
  • भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस

महत्त्वाच्या घटना:

मायकेल शूमाकर
मायकेल शूमाकर

१६९३: संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

१८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

१८७४: टंकलेखक (टाईपरायटर) – पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

१८७९: भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली.

१८८१: कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.

१९०३: टूर दी फ्रान्स – पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.

१९०८: एसओएस (SOS) – हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

१९०९: क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.

मदनलाल धिंग्रा
मदनलाल धिंग्रा

१९१९: कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.

१९३३: नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश

१९४७: फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

१९४८: बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना

१९४८: ’कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ’स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

१९४९: त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.

१९५५: ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.

१९६०: रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.

१९६१: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.

१९६२: सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

१९६३: झिप कोड – अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

१९६४: न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

१९६४: भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली.

१९६६: कॅनडा – देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.

१९७५: भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २० सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली.

१९७९: वॉल्कमन – सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.

१९८०: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

१९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.

१९९७: शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.

२००१: फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.

२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय – स्थापना झाली.

वेंकय्या नायडू
वेंकय्या नायडू

२००७: इंग्लंड – देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

२०१५: डिजिटल इंडिया – या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

२०१७: देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६४६: प्रख्यात जर्मन गणितज्ञ व तर्कशास्त्र विद्वान गाटफ्रीड विलहेल्म लाइबनिज(Gottfried Wilhelm Leibniz) यांचा जन्मदिन.

कल्पना चावला
कल्पना चावला

१८८२: डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (मृत्यू: १ जुलै १९६२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: ? ? १९२०)

पंडित हरिप्रसाद चौरसिया
पंडित हरिप्रसाद चौरसिया

१९१३: वसंतराव जाईक – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)

१९३८: प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्मदिन.

उस्ताद राशिद खान
उस्ताद राशिद खान

१९४९: वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताचे १३वे उपराष्ट्रपती

१९६१: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)

१९६६: उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक

१९६८: पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत परंपरेतील रामपूर-साहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचा जन्मदिन.

१९७३: साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८६०: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)

१९३८: गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्‍हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)

सर सी. वाय. चिंतामणी
सर सी. वाय. चिंतामणी

१९४१: सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)

१९६२: पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (जन्म: १ ऑगस्ट १८८२)

१९६२: डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)

१९६९: मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार

१९७१: सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता, )

१९८९: प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत. (जन्म: ? ? ????)

१९९४: राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक (जन्म: ? ? ????)

१९९९: एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *