dinvishesh-mpsc-23-march
dinvishesh-mpsc-23-march

हे पृष्ठ 23 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

२३ मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that have occurred on 23rd March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शहीद स्मृती दिन
  • पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन

महत्त्वाच्या घटना:

१९३१: सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९८०: प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, कन्‍नड, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)

१८९८: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)

१९१०: डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे ’मिठाचा सत्याग्रह’ या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही ‘अंग्रेजी हटाओ‘ ही चळवळ त्यांनी चालविली होती. (मृत्यू: १२ आक्टोबर १९६७)

१९१०: डॉ. राम मनोहर लोहिया.

१९१६: हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९२६: रविंद्र पिंगे.

१९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू १९२३: हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

१९५३: किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक

१९६८: माईक अ‍ॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९३१: सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.

१९३१: भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

१९३१: ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७)

१९३१: शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

२००८: गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म: १९१८?)

२०११: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *