डॉ. मोहन आगाशे
डॉ. मोहन आगाशे

हे पृष्ठ 23 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २३ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 23 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

१९८६ : जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.

१९८३ : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.

१९८३ : माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

१९८२ : ’इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

१९२९ : इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.

१९२७ : मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चंद्रशेखर आझाद

१९७६ : ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू

१९४७ : डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ

१९२७ : धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका

१९१७ : लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????)

१९०६ : चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

१८८६ : वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६)

१८८५ : युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)

१८५६ : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

महमूद

२०१२ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४)

२००४ : महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

१९९९ : दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

१९९७ : वसुंधरा पंडित – गायिका (जन्म: ? ? ????)

१८८५ : युलिसिस ग्रांट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ एप्रिल १८२२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *