हे पृष्ठ 22 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २२ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 22 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१९०८: ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा
१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे ‘हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.
१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.
१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
१९४६: इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.
१९४७: राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.
१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
१९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.
१९९९: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने समान कामांसाठी समान वेतन ही योजना लागू केली.
२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.
२००३: अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.
२०१२: भारताच्या राष्ट्रपती पदावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकरणी, प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
१८९४: भारतातील पहिल्या लोकसभेचे सदस्य सरदार तेज सिंह अकरपुरी यांचा जन्मदिन.
१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)
१९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)
१९२३: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
१९२५: गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक. भारत सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कर सन्मानित महाराष्ट्रीयन प्रतिष्ठित पत्रकार, इंग्रजी वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्सचे दिग्गज संपादक, इतिहासकार, अभ्यासक, समाजसुधारक व लेखक
१९३७: वसंत बाबुराव रांजणे – मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)
१९६५: रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते व आशा संस्थेचे एक संस्थापक व सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.
१९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
१९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.
१८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.
१९१८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)
१९४८: स्वातंत्र्य पूर्व भारतातील प्रसिद्ध भारतीय चित्रकार हेमेंद्रनाथ मजूमदार यांचे निधन.
१९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – उत्कृष्ट मराठी कथा लेखक, साहित्यिक व प्रकाशक (जन्म: ? ? १९०९)
१९८७: माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू ए. जी. क्रिपाल सिंह यांचे निधन.
१९९५: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)
२००३: कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १७ मे १९६६)
२००३: उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (जन्म: १८ जून १९६५)