हे पृष्ठ 3 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 3 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
- संस्कृती दिन – जपान
महत्त्वाच्या घटना:
१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
१९३८: पाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
१९०३: पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.
१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
१९१३: अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
१९१८: पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
१९५७: रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
१९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
२०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६८८: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
१९०१: पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २९ मे १९७२)
१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
१९२१: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
१९३३: अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
१९३७: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २५ मे १९९८)
१९५४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८१९: अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म: ? ? १७४४)
१८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)
१९९०: मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
१९९२: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
१९९८: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जानेवारी १९२०)
१९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
२०००: प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
२०१२: कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ आक्टोबर १९२३)