हे पृष्ठ 4 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ४ फेब्रूवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 4 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.
महत्त्वाच्या घटना:
१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला ‘ असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
१९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
२०००: विश्व कर्करोग दिन
२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण कर ण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
१९१७: जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)
१९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू
१९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११)
१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
१९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: ? ? ????)
१८९४: अॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
१९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४)
२००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८)
२००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३)