हे पृष्ठ 26 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २६ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 26 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
१४९८: मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच. एम. एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
१८८३: डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.
१९२०: अमेरिकेतील महिलांना १९६५ च्या कायद्या अंतर्गत मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
१९७२: पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर
१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
२००२: दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरांत दहा दिवसांच्या पृथ्वी शिखर परिषदेस प्रारंभ झाला.
२००८: भारतीय तेलगु चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांनी आपला नवीन पक्ष प्रजा राज्यम पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती या ठिकाणी पहिली सभा घेतली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०)
१७४३: अॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (मृत्यू: ८ मे १७९४)
१८९१: भारतीय हिंदी साहित्याचे लेखक व कादंबरीकार आचार्य चतुरसेन शास्त्री यांचा जन्मदिन.
१९१०: मदर तेरेसा – शांततेचा नोबल पुरस्कार तसचं, भारतीय सर्वोच्च नागीर पुरस्कार भारतरत्न सन्मानित अल्बेनियन-भारतीय रोमन कॅथोलिक धर्मगुरू व समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)
१९२२: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. ’स्वातंत्र्य संग्रामाचे महाभार’, ’लोकमान्य टिळक’, हाजी पीर’, ’सोनार बांगला’, ’भाकरी आणि स्वातंत्र्य’ इ. मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: २९ मे २०१०)
१९२७: बी. व्ही. दोशी – प्रख्यात वास्तुविशारद
१९२७: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता, ज्येष्ठ कॉंग्रेस नेता, व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांचा जन्मदिन.
१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)
१९४४: अनिल अवचट – लेखक व सामाजिक कार्यकर्ते
१९५६: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व देशाच्या प्रथम पंतप्रधान महिला इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७२३: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ आक्टोबर १६३२)
१९२७: त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९३४: प्रसिद्ध भारतीय बंगाली संगीतकार, गीतकार आणि गायक, तसचं, महान कायदेपंडित, परोपकारी, समाजसेवक, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक अतुल प्रसाद सेन यांचे निधन.
१९४८: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, लेखक, नाट्याचार्य, पत्रकार आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक व नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)
१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.
१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.
१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक.
१९७५: भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि कॉंग्रेस सेवा दलाचे संस्थापक व राजकारणी डॉ. नारायण सुब्बाराव हार्दिकर यांचे निधन.
१९९९: नरेन्द्रनाथ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू (जन्म: ? ? ????)
२०१२: ए. के. हनगल – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, हिंदी चित्रपट व रंगमंच अभिनेते (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)