Contents
हे पृष्ठ 29 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 29th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:

जागतिक पचन स्वास्थ्य दिवस
- लोकशाही दिन: नायजेरिया.
- International Day Of United Nations Peacekeepers
- End Of The Middle Ages Day

महत्त्वाच्या घटना:
१६६०: चार्ल्स दुसर्याची इंग्लंडच्या राजेपदी पुनर्स्थापना.
१७२७: पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
१८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
१९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.
१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

1953: उत्तुंग अशा एव्हरेस्ट शिखरावर शेर्पा तेनसिंग याने ब्रिटिश गिर्यारोहक एडमंड हिलरी बरोबर चढाई करुन पहिले पाउउल ठेवले.
१९८५: पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चार महिने लागले.
१९९९: स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
२०१९: ट्रांसजेंडर हे मानसोपचार आजाराच्या यादीतून जागतिक आरोग्य संघटनेने काढून टाकले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)

१९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)
१९१७: अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष जॉन केनेडी यांचा जन्म.
१९०५: हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका.
१९२९: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८१४: नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)
१८२९: विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
१८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)

१९७२: पृथ्वीराज कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
१९७७: भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन (भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक) (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
१९८७: चौधरी चरण सिंग, लोकदलाचे संस्थापक, भारताचे ५ वे पंतप्रधान. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
२००७: सन २००७ साली महाराष्ट्र राज्य लता मंगेशकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार स्नेहल भटकर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९१९)
२०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
२०२०: अजित जोगी (छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री).