५ सप्टेंबर दिनविशेष - 5 September in History
५ सप्टेंबर दिनविशेष - 5 September in History

हे पृष्ठ 5 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ५ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 5 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • भारतीय संस्कृत दिन
शिक्षक दिन - भारत.

शिक्षक दिन – भारत.

महत्त्वाच्या घटना:

१९३२: फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.

१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.

१९७७: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बाह्य सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी व्हॉएजर १ या उपग्रहाचे पृथ्वीवरून उड्डाण केले

१९८४: एसटीएस -४१-डी ही नासाच्या स्पेस शटल प्रोग्रामची १२ वी फ्लाइट आणि स्पेस शटल डिस्कवरीचे पहिले मिशन होते. हे डिस्कव्हरी यान आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण करून कॅलिफोर्नियामधील एडवर्ड्स एअर फोर्स बेस येथे दाखल झाले.

२०००: ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर

२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

२०१२: स्पेनमध्ये टेलिव्हिजनवर बंदी घालण्यात आलेल्या थेट बुलफाईटिंगच्या प्रसारणावर सहा वर्षाची बंदी उठवण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

११८७: लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

१६३८: लुई (चौदावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

१८७२: भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि तामिळनाडू राज्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेता व लोकमान्य टिळक यांचे शिष्य वी. ओ. चिदंबरम पिल्लै यांचा जन्मदिन.

१८८८: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

१८९५: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत ’दमयंती स्वयंवर’ व मुक्तेश्वरकृत ’महाभारताचे आदिपर्व’ हे उल्लेखनीय आहेत. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

१९०५: प्रसिद्ध भारतीय उपन्यासकार, कथाकार व संपादक वाचस्पती पाठक यांचा जन्मदिन.

१९०७: जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)

दमयंती जोशी
दमयंती जोशी

१९२०: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

१९२८: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

१९३३: आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘रॅमन मॅग्सेसे पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी व लोकपाल लक्ष्मीनारायण रामदास यांचा जन्मदिन.

१९४०: रॅक्‍वेल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९०६: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

१९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१)

१९७८: रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. ’रात्र’ आणि ’उत्तररात्र’ हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. मुंबई आकाशवाणीवरील ’वार्‍यावरची वरात’ व ’मेघदूत’ या श्राव्य नियतकालिकांचे ते निर्माते व लेखक होते. (जन्म: ? ? १९०८)

१९८६: अशोक चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय महान वैमानिक नीरजा भनोट यांचे निधन.

शरद जोशी
शरद जोशी

१९८६: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ञ व हिंदी साहित्यिक अंबिका प्रसाद दिव्य यांचे निधन.

१९९१: शरद जोशी – पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका संवाद आणि पटकथा लेखक (जन्म: २१ मे १९३१)

१९९२: अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: ? ? ????)

१९९५: सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

मदर तेरेसा
मदर तेरेसा

१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

१९९७: मदर तेरेसा – शांततेचा नोबल पारितोषिक आणि भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध समाजसेविका, व कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरू (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

२०००: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *