१९ सप्टेंबर दिनविशेष - 19 September in History
१९ सप्टेंबर दिनविशेष - 19 September in History

हे पृष्ठ 19 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

करनाम मल्लेश्वरी

१८९३: न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९५२: विनोदी कलाकार चार्ली चैप्लिन यांना अमेरिकेत येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध देश विरोधी भावनाला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावण्यात आला.

१९४६: फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला. दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे याला ७ वर्षे ऊशीर झाला. (website)

१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्‍नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

१९८५: मेक्सिको देशांत झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे सुमारे दहा हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

युवराजसिंग
युवराजसिंग

२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.

२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ’जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर

२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५५१: हेन्‍री (तिसरा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक
लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक

१९११: विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: अनंतराव कुलकर्णी – महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या पहिल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष, उत्तम साहित्यिक प्रकाशक व कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९२७: ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्याचे कवी कुँवर नारायण यांचा जन्मदिन.

१९५८: लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

पं. विष्णू नारायण भातखंडे
पं. विष्णू नारायण भातखंडे

१७२६: खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक (जन्म: ? ? ????)

१८८१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (जन्म: ????)

१९९३: दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी (जन्म: ? ? ????)

२००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १९ आक्टोबर १९५४)

२००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

२०१४: उप्पलपु श्रीनिवास (वय ४५) भारतीय सारंगी वादक

२०१८: विष्णु खरे (वय ८६)भारतीय कवी आणि लेखक

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *