अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट
अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट

हे पृष्ठ 20 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २० सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 20 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

वीर वामनराव जोशी
वीर वामनराव जोशी

२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).

१९७७ : व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७३ : बॅटल ऑफ सेक्सेस – ह्यूस्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.

१९१३ : वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर
गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर

१९०९ : गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

१९४९ : महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक

१९३४ : सोफिया लॉरेन – हॉलीवूडमधील इटालियन अभिनेत्री

१९२५ : आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा (मृत्यू: ९ जून १९४६)

१९२२ : द. न. गोखले – चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.

१८९८ : नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

१८५३ : चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (मृत्यू: २३ आक्टोबर १९१०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार
कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार

१९९७ : कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)

१९३३ : अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)

१९१५ : संत गुलाबराव महाराज (जन्म: ६ जुलै १८८१)

१८१० : मीर तकी मीर – ऊर्दू शायर (जन्म: ? ? १७२३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.