करीना कपूर
करीना कपूर

हे पृष्ठ 21 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 21 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक अल्झायमर जागरुकता दिन
जागतिक अल्झायमर जागरुकता दिन
  • जागतिक अल्झायमर जागरुकता दिन

महत्त्वाच्या घटना:

१९९१ : आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.

१९८४ : ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९८१ : ’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९७६ : सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९७१ : बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६८ : रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

१९६५ : गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९६४ : माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.

१९४२ : दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.

१९३४ : ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून ’प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास अशा अनेक ठिकाणी ’प्रभात’ नावाची चित्रपटगृहे निघाली.

१७९२ : अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

रिमी सेन
रिमी सेन

१९८१ : रिमी सेन – अभिनेत्री

१९८० : करीना कपूर – अभिनेत्री

१९७९ : ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू

१९६३ : कर्टली अँब्रोस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज

१९२९ : पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)

१९४४ : राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते

१९२६ : ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००० – कराची, सिंध, पाकिस्तान)

१८६६ : एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गोपालन कस्तुरी
गोपालन कस्तुरी

२०१२ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४)

१९९८ : फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९)

१९९२ : ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म: १० मे १९१४)

१९८२ : सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म: २१ जून १९२३)

१७४३ : सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.