हे पृष्ठ 2 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 2nd June. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- इटालीचा प्रजासत्ताक दिवस
- आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन (International Sex Workers Day)
- अमेरिकन भारतीय नागरिकत्व दिन (American Indian Citizenship Day)
महत्त्वाच्या घटना:
१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
१८६२: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला.
१८९६: गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.
१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले – “माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे”.
१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४७: भारताची फ़ाळणी करण्याची लॉर्ड मांऊटबॅटन यांची घोषणा.
१९४८: शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
१९५३: इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.
१९६६: अमेरिकेचे पहिले अंतरीक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले.
१९७४: माली या देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९७४)
१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९: भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.
२०००: लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर
२००४: ऑस्ट्रेलियन मॉडेल्स जेनीफर हॉकिन्स यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
२००६: अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संपूर्ण संघटनांवर प्रतिबंध लावला.
२०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७३१: मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ’फर्स्ट लेडी’ (मृत्यू: २२ मे १८०२)
१८४०: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (मृत्यू: ११ जानेवारी १९२८)
१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
१९३०: अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.
१९३०: भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेता व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचा जन्मदिन.
१९५१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसचं माजी केंद्रीय ऊर्जा व शिवसेना पक्ष सदस्य अनंत गंगाराम गीते यांचा जन्मदिन.
१९४३: इलियाराजा – गीतकार आणि संगीतकार
१९५५: नंदन नीलेकणी – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक
१९५५: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.
१९५६: मणीरत्नम – चित्रपट दिग्दर्शक
१९६३: आनंद अभ्यंकर – अभिनेते (मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)
१९६५: मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९६५: स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९७४: गाटा काम्स्की – अमेरिकन बुद्धीबळपटू
१९८०: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाजपटू डोला बॅनर्जी यांचा जन्मदिन.
१९८७: भारतीय चित्रपट अभिनेत्री व गायिका सोनाक्षी सिन्हा यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८२: जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता (जन्म: ४ जुलै १८०७)
१९७५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)
१९७८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक प्राण कृष्ण पारिजा यांचे निधन.
१९८८: राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (जन्म: १४ डिसेंबर १९२४)
१९९०: सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (जन्म: ५ मार्च १९०८)
१९९२: मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १९३४)
२०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)