dinvishesh-mpsc-17-april
dinvishesh-mpsc-17-april

हे पृष्ठ 17 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 17th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९३५: सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.

१९७०: चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी मधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ’माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर

१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.

???? : ’अपोलो-१३’ हे अंतराळयान चांद्रमोहीम अर्ध्यावर सोडून सुखरुप पृथ्वीवर परतले.

१९५२: पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली.

१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

१९४६: सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९४१: दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

कवी सूरदास
कवी सूरदास

१४७९: कवी सूरदास, हिंदीतील एक थोर कवी व श्रेष्ठ कृष्ण भक्त.

१८९१: यशवंत रामकृष्ण दाते,नामवंत मराठी कोशकार.

१९७७: दिनेश मोंगिया – क्रिकेटपटू

१९७२: मुथैय्या मुरलीधरन – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६१: गीत सेठी – बिलीयर्डसपटू

१९५१: बिंदू – चित्रपट अभिनेत्री

मुथैय्या मुरलीधरन
मुथैय्या मुरलीधरन

१९१६: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलमंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले. (मृत्यू: १० आक्टोबर २०००)

१८९७: निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८१)

१८९१: यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (मृत्यू: २१ मार्च १९७३)

१८३७: जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (मृत्यू: ३१ मार्च १९१३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९०: बेंजामिन फ्रँकलिन, विजेच्या शक्तीविषयी महत्त्वाचा शोध लावणारे अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ.

१९७५: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)

२०१२: वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.

२०११: विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (जन्म: ४ जुलै १९२६)

२००४: सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १८ जुलै १९७२)

२००१: डॉ. वामन दत्तात्रय तथा ’वा. द.’ वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (जन्म: १९ आक्टोबर १९२५)

१९९८: चित्रपट निर्माते विजय सिप्पी (वय ५५) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू (जन्म: ????)

१९९७: बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (जन्म: ५ मार्च १९१६)

१९४६: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.