हे पृष्ठ 8 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 8th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
जागतिक रेड क्रॉस दिवस
रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते.
- युरोप विजय दिन
महत्त्वाच्या घटना:
१८६३: आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ म्हणजेच आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीची स्थापना करण्यात आली.
१८८६: डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९३३: महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
१९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९५४: केंद्र सरकारने चंद्रनगरला पश्चिम बंगाल प्रांतात समाविष्ट केले.
१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
१९९४: ब्रिटन व फ्रान्सला जोडणार्या इंग्लिश खाडीच्या खालून खोदलेल्या युरो टनेल या बोगद्याचे उदघाटन
२००४: प्रसिद्ध श्रीलंकन क्रिकेटपटू गोलंदाज मुथैया मुरलीधरन यांनी ५२१ खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८२८: रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९१०)
१८८४: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)
१९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.
१९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)
१९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.
१९२६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तपन राय चौधरी यांचा जन्मदिन.
१९२९: भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसचं हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांत दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचा जन्मदिन. त्यांनी गायिलेला ठुमरी हा शास्त्रीय संगीत प्रकारासाठी त्या विशेष ओळखल्या जातात.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.
१९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.
१८१७: देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७७७: बंगालचे नवाब मीर कासीम यांचे दिल्ली जवळील कोतलाव या ठिकाणी अति दारिद्र्य आणि अस्पष्ट्पणामुळे त्यांचे निधन झाले.
१७९४: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)
१८९९: वासुदेव चाफेकर.
१९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.
१९१५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राजकीय नेता अमीरचंद बोंबवाल यांचे निधन.
१९२०: भारतीय प्राचीन कालीन भाषा पाली व बौध्द साहित्याचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन
१९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)
१९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे यांचे निधन.
१९८२: अनिल उर्फ कवि अनिल (आत्माराम रावजी देशपांडे), मराठी कवी.
१९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८८९)
१९९३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व मार्क्सवादी तत्त्ववेत्ता देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे निधन.
१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)
१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.
१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.
२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)
२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)
२०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)