जन्म | १४ जुलै १९२० (पैठण,औरंगाबाद) |
स्मृती | २६ फेब्रुवारी २००४ (मुंबई) |
डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्रीआणिभारत सरकारचेकेंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणयेथे झाला. माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाणहे त्यांचे सुपुत्र.
त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले.
1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.
पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.
कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.