हे पृष्ठ 12 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १२ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 12 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६६६: आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.
१७८६: ब्रिटीश इस्ट इंडियाचे अधिकारी लॉर्ड कॉर्नवॉलिस(Charles Cornwallis) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले.
१८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
१८७३: टाइपराइटर पहिल्यांदा ग्राहकांना विकण्यात आले.
१९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
१९३०: विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अॅक्शन’ असे केले जाते.
१९५९: ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी डार्डानेल्स खाडी पार केली.
१९८०: तुर्कस्तानमधे लष्करी उठाव
१९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
२००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
२००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.
२०११: हल्ल्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक समर्पण समारंभ पार पडल्यानंतर न्यूयॉर्क शहरातील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु करण्यात आलं.
–
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.
१६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.
१७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.
१८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)
१८९४: विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
१८९७: आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ मार्च १९५६)
१९१२: फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
१९४८: मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू (मृत्यू: ????)
१९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.
१९२६: विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि ’महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक, १८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. (जन्म: ? ? १८७१)
१९५२: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
१९७१: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले. (जन्म: २ मार्च १९२५)
१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.
१९९६: पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर – मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले. (जन्म: ? ? ????)
१९९६: पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. (जन्म: ७ जुलै १९४८)