महात्मा गांधी जयंती
महात्मा गांधी जयंती

हे पृष्ठ 2 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 2 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • महात्मा गांधी जयंती
  • लाल बहादूर शास्त्री जयंती
  • बालसुरक्षा दिन
  • स्वच्छता दिन
  • गिनीचा स्वातंत्र्यदिन

महत्त्वाच्या घटना:

रमाबाई रानडे
रमाबाई रानडे

२००६ : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

१९६९ : महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

१९६७ : थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९५८ : गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५५ : पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच फॅक्टरी’ सुरू झाली

१९२५ : जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री
आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री

१९७१ : कौशल इनामदार – संगीतकार व गायक

१९६८ : याना नोव्होत्‍ना – झेक लॉन टेनिस खेळाडू

१९४८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

१९४२ : आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री

१९२७ : पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

१९०८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

लाल बहादूर शास्त्री
लाल बहादूर शास्त्री

१९०४ : लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

१८९१ : विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४) (मृत्यू: १३ जून १९६७) येथे क्लिक करा

१८६९ : महात्मा गांधी (मृत्यू: ३० जानेवारी १९४८ – नवी दिल्ली)

१८४७ : पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

९७१ : गझनीचा महमूद (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री

१९८५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)

१९७५ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (जन्म: १५ जुलै १९०३)

१९२७ : स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९०६ : राजा रविवर्मा – चित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.