२८ ऑक्टोबर दिनविशेष - 28 October in History
२८ ऑक्टोबर दिनविशेष - 28 October in History

हे पृष्ठ 28 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन

महत्त्वाच्या घटना:

१४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

१४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

बेनिटो मुसोलिनी
बेनिटो मुसोलिनी

१६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना

१८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

१९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

१९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

१९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

बिल गेटस
बिल गेटस

१८६७: मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)

१८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

१९३०: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)

१९५५: इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी

१९५५: बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक

१९५६: मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

१९५८: अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री

१९६७: ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री

१९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६२७: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (जन्म: ३० ऑगस्ट १५६९)

१८११: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

१९००: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (जन्म: ६ डिसेंबर १८२३)

१९४४: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

२००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

२०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)

२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *