१५ सप्टेंबर दिनविशेष - 15 September in History
१५ सप्टेंबर दिनविशेष - 15 September in History

हे पृष्ठ 15 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १५ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 15 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

भारतीय अभियंता दिन

भारतीय अभियंता दिन

  • विश्वकर्मा दिवस

 

महत्त्वाच्या घटना:

नेपोलियन बोनापार्ट
नेपोलियन बोनापार्ट

१८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.

१८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडूरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन

१८३५: चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.

१९१६: पहिले महायुद्ध – लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर सॉमच्या युद्धात केला गेला

१९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल ’द डून स्कूल’ (The Doon School) सुरू झाले.

१९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

१९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत

श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
श्रीमती विजयालक्ष्मी पंडित

१९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड

१९५९: निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.

१९५९: प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.

१९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

२०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२००८: लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळे काढले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दिवाळखोरी आहे.

२०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

१२५४: मार्को पोलो – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४)

१८६०: भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय अभियंता दिन म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

१८७६: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)

१८८१: इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म.

१८९०: अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)

१९०५: राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे ’वीर हमीद’, ’निशीथ’, ’चितोड की चिता’ इ. काव्यसंग्रह, ’एकलव्य’ हे खंडकाव्य, ’पृथ्वीराज की आँखे’, ’रेशमी टाई’, ”सप्तकिरण’, ’शिवाजी’ इ. एकांकिका संग्रह व अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ५ आक्टोबर १९९०)

१९०९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

१९०९: रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)

सुब्रम्हण्यम स्वामी
सुब्रम्हण्यम स्वामी

१९२१: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)

१९३५: दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)

१९३९: सुब्रम्हण्यम स्वामी – जनता पक्षाचे अध्यक्ष, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, योजना आयोगाचे सदस्य, केन्द्रीय मंत्री

१९४६: माईक प्रॉक्टर – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ
गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ

१९९८:गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ लवंदे यांचे मलेरियाच्या आजाराने निधन झाले. (जन्म: ? ? ????)

२००८: गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

२०१२: के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (जन्म: १८ जून १९३१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *