१४ सप्टेंबर दिनविशेष - 14 September in History
१४ सप्टेंबर दिनविशेष - 14 September in History

हे पृष्ठ 14 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 14 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

हिंदी दिवस

महत्त्वाच्या घटना:

दत्ता डावजेकर
दत्ता डावजेकर

७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.

१८९३: सरदार खाजवीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय.

१९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.

१९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

१९५९: सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

१९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.

१९७८: ’व्हेनेरा-२’ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

१९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

२०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

२००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

२०१५: गुरुत्वीय लहरी – गुरुत्वीय लहरींचे (gravitational waves) पहिले निरीक्षण करण्यात आले.

२०१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज संयुक्तपणे भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग
रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग

१७१३: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ जुलै १७८१)

१७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

१८६७: विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

१८९७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)

१८९८: महाराष्ट्रीयन मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्मदिन.

१९०१: यमुनाबाई हिर्लेकर – शिक्षणतज्ञ व विचारवंत (मृत्यू: ? ? ????)

१९१४: भारतीय हिंदी चित्रपत सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांचा जन्मदिन.

१९२१: दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ’मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले. (मृत्यू: ३० मे १९८९)

१९२३: राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत, प्रसिद्ध भारतीय राजकारणी व कायदेपंडित तसचं, माजी भारतीय बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष

१९३२: डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते (मृत्यू: २ मार्च १९८६)

१९४८: वीणा सहस्रबुद्धे – प्रख्यात भारतीय ग्वाल्हेर व जयपूर येथील किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील गायक व संगीतकार

१९५७: केपलर वेसेल्स – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू

१९६३: रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

८९१: पोप स्टीफन (पाचवा) (जन्म: ? ? ????)

१९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)

१९७१: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार, लेखक व साहित्यकार ताराशंकर बंद्योपाध्याय यांचे निधन.

हरिश्चंद्र बिराजदार
हरिश्चंद्र बिराजदार

१९७९: नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ जुलै १९१७)

१९८५: भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार रामकृष्ण शिंदे यांचे निधन.

१९८९: बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री (१९५८), पद्मभूषण (१९६८), इंडीयन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले संचालक, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. (जन्म: २६ मे १९०६)

१९९८: प्रा. राम जोशी – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

२०११: हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म: ५ जून १९५०) – ध्यानचंद पुरस्कार सन्मानित भारतीय कुस्तीगीर व प्रशिक्षक

२०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *