५ ऑक्टोबर दिनविशेष - 5 October in History
५ ऑक्टोबर दिनविशेष - 5 October in History

हे पृष्ठ 5 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 5 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक शिक्षक दिन

आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन

पंडित नेहरुं
पंडित नेहरुं

महत्त्वाच्या घटना:

१८६४: एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार

१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१९४४: साली फ्रांस देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.

मीरासाहेब फातिमा बिबी
मीरासाहेब फातिमा बिबी

१९४६: साली फ्रांस देशातील कान्स या शहरात आयोजित पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता झाली.

१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.

१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९६२: ’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर

१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५२४: साली भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध गोंडवाना राज्याच्या राजकर्त्या राणी दुर्गावती यांचा जन्मदिन.

१८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते. (मृत्यू: ? ? ????)

१९०२: साली जगातील सर्वात यशस्वी फूड ऑपरेशनमध्ये मॅकडोनाल्डचे रूपांतर करणारे महान अमेरिकन फास्ट-फूड टायकून रेमंड अल्बर्ट क्रोक(Ray Kroc) यांचा जन्मदिन.

१९०२: साली पद्मश्री पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि हिंदुस्थानी गायन संगीतातील सर्वात प्राचीन शैलींपैकी एक असलेल्या ध्रुपद परंपरेच्या दरभंगा घराण्याच्या बाह्य जगाचे उद्दीष्टक व संस्थापक राम चतुर मलिक यांचा जन्मदिन.

१९२२: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)

१९२२: यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १० मे १९९८)

माधव आपटे – क्रिकेटपटू
माधव आपटे – क्रिकेटपटू

१९२३: कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)

१९३२: माधव आपटे – क्रिकेटपटू

१९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)

१९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.

१९७५: केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८०५: साली ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी व दुसरे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस (Lord Cornwallis) यांचे निधन.

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)

१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

१९८१: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

१९८३: अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म: २८ जुलै १९०७)

रामनाथ गोएंका
रामनाथ गोएंका

१९९०: राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३). त्यांचे ’वीर हमीद’, ’निशीथ’, ’चितोड की चिता’ इ. काव्यसंग्रह, ’एकलव्य’ हे खंडकाव्य, ’पृथ्वीराज की आँखे’, ’रेशमी टाई’, ”सप्तकिरण’, ’शिवाजी’ इ. एकांकिका संग्रह व अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

१९९१: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९२: बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत

१९९७: चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

स्टीव्ह जॉब्ज
स्टीव्ह जॉब्ज

२००३: साली  भारतातील इंग्लिश बिलियर्ड्सचे व्यावसायिक खेळाडू विल्सन जोन्स(Wilson Jones) यांचे निधन.

२०११: स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *