हेमा मालिनी
हेमा मालिनी

हे पृष्ठ 16 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 16 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

हेन्‍री किसिंजर

१९९९ : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

१९८४ : आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९७५ : बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

१९७३ : हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ली डक थो
ली डक थो

१९६८ : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान

१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

१९२३ : वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ’द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.

१९०५ : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

१८६८ : डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

१८४६ : डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१७९३ : फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.

१७७५ : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अजय सरपोतदार
अजय सरपोतदार

२००३ : कृत्तिका – नेपाळची राजकन्या

१९५९ : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जून २०१०)

१९४८ : हेमा मालिनी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक

१९०७ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ४ आक्टोबर १९८२)

१८९६ : सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक (मृत्यू: १८ जून १९७४)

१८९० : अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

१८५४ : ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार, ’कलेसाठी कला’ या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत ’दूरचे दिवे’ हे नाटक ’अ‍ॅन आयडियल हजबंड’चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य ’द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ या नावाने संकलित झाले आहे. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

१८४१ : इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: २६ आक्टोबर १९०९)

१६७० : बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू: ९ जून १७१६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गुरुनाथ प्रभाकर ओगले
गुरुनाथ प्रभाकर ओगले

२००२ : नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३)

१९९७ : दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक (मृत्यू: ? ? ????)

१९८१ : मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म: २० मे १९१५)

१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म: १ आक्टोबर १८९५)

लियाकत अली खान
लियाकत अली खान

१९५० : वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: ? ? ????)

१९४८ : माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: ? ? १८८५)

१९४४ : गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, ’प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: ? ? १८८७)

१९०५ : पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

१७९३ : मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.