हे पृष्ठ 15 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 15 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
गोपाळ गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर

१९९७ : भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ’बुकर पुरस्कार’ मिळाला.

१९९३ : वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्‍नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

१९३५ : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन ’एअर इंडिया’ ही कंपनी अस्तित्त्वात आली. (व पुढे तिचा बोर्‍या वाजताना आपण पाहतोच आहे)

१९१७ : पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१८८८ : गोपाळ गणेश आगरकरांच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

नारायण गंगाराम सुर्वे – कवी
नारायण गंगाराम सुर्वे – कवी

१९६९ : पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९५७ : मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका

१९४९ : प्रणोय रॉय – पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक

१९३४ : एन. रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक

मीरा नायर
मीरा नायर

१९३१ : अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकिर हुसेन (१९६३) या भारतरत्‍न मिळालेल्या व्यक्ति पुढे राष्ट्रपती झाल्या.

१९२६ : नारायण गंगाराम सुर्वे – कवी (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

१९२० : मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९९९)

१९०८ : जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

१८८१ : पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१६०८ : इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (मृत्यू: २५ आक्टोबर १६४७)

१५४२ : बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (मृत्यू: १२ आक्टोबर १६०५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२ : वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (जन्म: ६ डिसेंबर १९२३)

१९६१ : सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ’सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

१९४६ : हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (जन्म: १२ जानेवारी १८९३)

१९३० : हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (जन्म: २६ फेब्रुवारी १८६६)

१९१८ : साई बाबा (जन्म: ? ? ????)

१९१७ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)

१७८९ : रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात १५७१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते. (जन्म: ? ? १७२०)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.