हे पृष्ठ 24 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २४ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 24 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय बालिका दिवस
महत्त्वाच्या घटना:
१८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.
१८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
१८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.
१९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
१९४२: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
१९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार
१९६६: एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
१९५०: भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली
१९५१: प्रेम माथुर ह्या देशाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या.
१९५२: मुंबई येथे पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साजरा करण्यात आला.
१९६६: भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
१९७६: ’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.
१९८४: अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
१९९०: जपान ने पहिला हितेन नावाचा लूनर प्रोब प्रक्षेपित केल्या गेला.
१९९६: अमेरिकेच्या पहिल्या महिल्या हिलेरी क्लिंटन यांना न्यायालयात हाजीर राहण्यास सांगितले.
२००२: भारतीय उपग्रह इनसेट-३ आपल्या कक्षेत स्थापित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८२६: पहिले भारतीय बॅरिस्टर ज्ञानेंद्र मोहन टागोर यांचा जन्म.
१८७७: भारतीय स्वातंत्र्य सैनिक पुलिन बिहारी दास यांचा जन्म.
१९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)
१९२४: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)
१९४३: सुभाष घई – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
१९४५: भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म.
१९४५: भारतीय राजनीती तज्ञ प्रदीप भट्टाचार्य यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
१९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० आक्टोबर १९०९)
२००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्याव सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
२०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)