११ फेब्रुवारी दिनविशेष - 11 February in History
११ फेब्रुवारी दिनविशेष - 11 February in History

हे पृष्ठ 11 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 11 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)

महत्त्वाच्या घटना:

६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

होस्‍नी मुबारक
होस्‍नी मुबारक

१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

१८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.

१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

१९११: हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ’एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

मोरारजी देसाई
मोरारजी देसाई

१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.

१९३३: आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.

१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका

१९९७: खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७५०: आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.

गौरी देशपांडे
गौरी देशपांडे

१८००: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

१८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२)

१८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)

१९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

१९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३)

१९५६: भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.

१९५७: प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.

१९६१: भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.

१९६७: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही
सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही

१६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६)

१९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

फक्रुद्दीन अली अहमद
फक्रुद्दीन अली अहमद

१९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली. (जन्म: १३ मे १९०५)

१९८६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

१९८९: ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.

१९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)

२००७: भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *