४ ऑक्टोबर दिनविशेष - 4 October in History
४ ऑक्टोबर दिनविशेष - 4 October in History

हे पृष्ठ 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 4 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक प्राणी दिन

जागतिक प्राणी दिन

राष्ट्रीय एकता दिन

महत्त्वाच्या घटना:

१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

बेनिटो मुसोलिनी
बेनिटो मुसोलिनी

१९२७: गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१९३१: इटली देशांत पहिला जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला.

१९४०: ’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

अ‍ॅडॉल्फ हिटलर
अ‍ॅडॉल्फ हिटलर

१९५७: सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९: सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९७७: भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीला हिंदी भाषेत संबोधित केले. हिंदी भाषेत केलं गेलेलं हे पहिलच भाषण होय.

१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२२: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका

१८५७: प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक व पत्रकार तसचं, लंडनमध्ये इंडियन होम रुल सोसायटी, इंडिया हाउस आणि द इंडियन समाजशास्त्रज्ञांची स्थापना करणारे महान क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्मदिन.

१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

१९१३: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० आक्टोबर २००६)

१९१६: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती (मृत्यू: ????)

अरुण सरनाईक
अरुण सरनाईक

१९२८: ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक

१९३५: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४)

१९३७: जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६६९: रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म: १५ जुलै १६०६)

१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

१९२१: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ’हाच मुलाचा बाप’, ’सन्याशाच्या मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ’सौभद्र’, ’शारदा’, ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१९४७: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८)


१९६६: अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११)

संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट

१९८२: सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. (जन्म: १६ आक्टोबर १९०७)

१९८९: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म: २३ आक्टोबर १९२४)

१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.

२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *