३० जुलै दिनविशेष - 30 July in History
३० जुलै दिनविशेष - 30 July in History

हे पृष्ठ 30 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३० जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 30 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे

महत्त्वाच्या घटना:

राजेंद्रसिंह
राजेंद्रसिंह

७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

१८३६: अमेरिकेतील हवाई या शहरात पहिला इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशित झाले.

१८९८: विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.

१९०९: अमेरिकन वैमानिक व शास्त्रज्ञ राईट बंधू(Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.

१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

लता मंगेशकर
लता मंगेशकर

१९६२: ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

१९६६: इंग्लंड च्या फुटबॉल संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकला.

१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार’ जाहीर

२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल

२००१: राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.

२०१२: दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

अर्नोल्ड श्वार्झनेगर
अर्नोल्ड श्वार्झनेगर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

१८२२: वाजिद अली शाह

१८५५: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (मृत्यू: १४ आक्टोबर १९१९)

१८६३: हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

१८८६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्मदिन.

१९२३: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार, संस्कृतज्ञ व सौंदर्यशास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा जन्मदिन.

१९२८: साली पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.

१९४५: सेवानिवृत्त भारतीय नागरी सेवक व भारताचे माजी १६ वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा जन्मदिन.

सोनू निगम
सोनू निगम

१९४७: अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल

१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)

१९७३: सोनू निगम – पार्श्वगायक

१९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

१७७१: अठराव्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी, पत्र-लेखक व शास्त्रीय अभ्यासक थॉमस ग्रे (Thomas Gray) यांचे निधन.

१८९८: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (जन्म: १ एप्रिल १८१५)

१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

डॉ. अशोक रानडे
डॉ. अशोक रानडे

१९६०: ’कर्नाटक सिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३१ मार्च १८७१)

१९८३: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक (२ मे १९२०)

१९९४: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

१९९५: डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (जन्म: ६ जुलै १९२०)

१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

२०११: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (जन्म: २५ आक्टोबर १९३७)

२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *