२७ जुलै दिनविशेष - 27 July in History
२७ जुलै दिनविशेष - 27 July in History

हे पृष्ठ 27 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 27 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

१८९७: बाळ गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं.

१९२१: रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

एम. करुणानिधी
एम. करुणानिधी

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

१९८७: पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक जहाजाचा मलबा सापडला.

१९९७: तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय

२०१२: लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अ‍ॅलन बॉर्डर
अ‍ॅलन बॉर्डर

१६६७: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

१७२४: राजस्थान मधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रतापसिंह द्वितीय यांचा जन्मदिन.

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

१९११: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

१९१३: भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्मदिन.

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

१९४०: भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका व कादंबरीकार भारती मुखर्जी यांचा जन्मदिन.

१९५०: ग्रामी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणा वादक व्ही. एम. भट्ट यांचा जन्मदिन.

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

१९५५: अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

१९६९: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन संघाचे प्रशिक्षक जोंटी रोड्स यांचा जन्मदिन.

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

१९९०: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सॅनॉन यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

वामन दत्तात्रय पटवर्धन
वामन दत्तात्रय पटवर्धन

१८४४: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

१८९५: उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे. (जन्म: ? ? ????)

१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.

१९७५: त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले. (जन्म: ? ? ????)

१९८०: मोहम्मद रझा पेहलवी – इराण देशाचे शेवटचे शासक व शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध (जन्म: २६ आक्टोबर १९१९)

१९९२: अमजद खान – हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)

१९९७: बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते

२००२: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

२००७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७)

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१). भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, तसचं, पद्मभूषण व पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित “मिसाईल मॅन” म्हणून प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व माजी भारतीय राष्ट्रपती

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *