हे पृष्ठ 28 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २८ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक निसर्ग संवर्धन दिन: दरवर्षी २८ जुलै रोजी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day)’ साजरा करण्यात येतो.

महत्त्वाच्या घटना:

१८२१: पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९१४: प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती.

१९२५: २८ जुलै हा दिवस विश्व हिपॅटायटीस डे म्हणून साजरा करण्यात येतो.

१९३३: सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

चौधरी चरणसिंग
चौधरी चरणसिंग

१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

१९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

१९७९: भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

१९८४: अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

इंदिरा गोस्वामी
इंदिरा गोस्वामी

१९९८: सर्वोच्‍च आणि उच्‍च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन

१९९९: भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड

२००१: प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

ह्युगो चावेझ
ह्युगो चावेझ

१९०७: अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (मृत्यू: ५ आक्टोबर १९८३)

१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

१९२८: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ व भारतातील संगणकीय रसायन शास्त्राचे प्रणेते तसच, कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक पल्लीकरणई तिरुमलाई नरसिंहन यांचा जन्मदिन.

१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार हिरेन भट्टाचार्य यांचा जन्मदिन.

१९३५: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उद्योग तज्ञ आणि हिंदुस्तान लीव्हरचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक शेखर गांगुली यांचा जन्मदिन.

१९३६: सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक

१९४०: साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित गुजराती भाषिक कवी व निबंध लेखक अनिल जोशी यांचा जन्मदिन.

१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

१९५४: ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)

१९६५: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध बासरीवादक रोनू मजूमदार यांचा जन्मदिन.

१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

४५०: ४५०ई.पुर्व : पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

१९६८: ऑटो हान – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)

राजा ठाकूर
राजा ठाकूर

१९७२: भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरु करणाऱ्या चारू मजूमदार यांचे निधन.

१९७५: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)

१९७७: गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक (जन्म: ? ? ????)

१९८१: बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: ? ? १९६२)

२०१६: पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेतादेवी यांचे निधन.

२०१७: भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *